भा.ज.पाच्या तालुका उपाध्यक्षपदी सुरेंद्र(नाना) चिटणीस
पूर्णा ता.२०(प्रतिनिधी)भा.ज.पाच्या उप तालुकाध्यक्षपदी सुरेंद्र (नाना) चिटणीस यांची निवड करण्यात आली असून,लोकसभा प्रभारी मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष सूरेश भुंबरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

पूर्णा येथील कृ.उ.बाजार समीतीच्या सभागृहात रविवारी या.२० रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा प्रभारी मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष सूरेश भुंबरे यांच्या पदाधीकारी, कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मोहीते, शहराध्यक्ष गोविंद ठाकर, बाळासाहेब कदम,प्रशांत कापसे,बळीराम कदम, डॉ.अजय ठाकूर,अनंता पारवे, विजय कराड,आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यात अलीकडेच शिवसेनेतुन भाजपात दाखल झालेल्या उपशहरप्रमुख सुरेंद्र ऊर्फ नाना चिटणीस यांच्यावर पक्ष बळकटी करणासाठी तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देऊ केली आहे. चिटणीस यांना मा.आ.बोर्डीकरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यांच्या निवडी बद्दल विनय कराड,चंद्रकांत टाकळकर, संजय अंभोरे, माऊली कदम,भारत एकलारे, डॉ.विजय ठाकूर, इंजि.एम.डी. वाघमारे,आदींनी अभिनंदन केले आहे.