ना.मेघनाताई बोर्डीकरांची सोशल मेडीयावर बदनामी;पूर्णेत भाजप कार्यकर्त्यांचे पोलीसांना निवेदन
पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)
राज्याच्या राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांचे विषयी सोशल मीडियावर वारंवार अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर लिहीत असलेल्या ईसमावारकायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथिल भाजप कार्यत्यांनी पूर्णा पोलीसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मा.ना.बोर्डीकर यांच्या विषयी विष्णु नागरे नामक ईसम फेसबुक,वाटस अॅपवर सतत बदनामीकारक मजकूर लिहीत आहे.यामुळे संबंध भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत आहे.सदरील ईसमावर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.(ता.२७) रोजी पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांना पूर्णा भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.निवेदनावर भाजपा प्रदेश सचिव विनय कराड,प्रशांत कापसे, जिल्हा संयोजक विजय कराड,शहर अध्यक्ष राज ठाकर,विष्णु कराळे,,निलेश कुऱ्हे,विजय खिलोशिया,वैभव जिरवणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.