पूर्णा ता.४(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील विविध आघाड्यांवर नवीन पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या वतीने संधी दिली आहे.पूर्णेतील भाजपचे कट्टर कार्यकर्ते विजय कराड यांची आयुष्मान भारतच्या परभणी जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली असून, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. परभणी येथे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या कार्यालयात भाजपच्या जिल्हा व तालुक्यासह विविध आघाडीच्या पदाधीका-यांच्या निवडी बद्दल नुकतीच एक बैठक पार पडली यावेळी पालकमंत्र्यांसह,जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे या बैठकीत आयुष्मान भारत परभणी जिल्हा संयोजक म्हणून पूर्णा येथील विजय वाल्मीक कराड यांची नियुक्ती राज्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार मेघना साखोरे बोर्डीकर दीदी व भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, लोकसभा प्रमुख मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर, मा.आ.सुरेश वरपुडकर,मा.रामराव वडकुते, विठ्ठल रबदडे, व्यंकटराव तांदळे, प्रेरणादिदी वरपुडकर, बालाजी देसाई, यांची उपस्थिती होती.या निवडी बद्दल माजी जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे,प्रदेश कार्यकारणी सदस्य रामप्रभु मुंढे, पूर्णा तालुकाध्यक्ष संजय मोहिते,जिल्हा उपाध्यक्ष कपिल कदम, सभापती बालाजी खैरे, ऋषिकेश सकनूर,आकाश लोहट,बळीराम कदम, विश्वनाथ सोळंके,विनय कराड,सुनील डूब्बेवार,डॉ.अजय ठाकूर,प्रशांत कापसे, शहराध्यक्ष राज ठाकर, बालाजी कदम,रोशन एकलारे,राम पुरी,गोवर्धन मस्के,राम चापके, निवृत्ती बोकारे, निरज घोसीकर,नाना चिटणीस आदींनी अभिनंदन केले आहे.