BJPभाजपच्या घर घर सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाच्या घर घर सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून,युवा कार्यकर्ते राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली ५ जानेवारी पासून कार्यकर्ते पदाधिकारी शहर व परिसरात नागरिकांच्या निवासस्थानी भेटी देऊन नोंदणी अभियान राबवत आहेत.या अभियानाला पूर्णेत मोठा प्रतिसाद मिळत आहे.
    भाजपच्या वतीने राज्यात पक्षाची वाढ आणि संघटन मजबूत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री आ.रवींद्रजी चव्हाण ,लोकसभा समन्वयक डॉ. केदार खटिंग जिल्हा सदस्य नोंदणी समन्वयक सुभाषजी अंबट यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.या अभियाना अंतर्गत पूर्णा शहरातील भाजपचे युवा नेते राज ठाकर यांच्या वतीने दि.५ जानेवारी पासून घर घर सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.यावेळी भाजपचे लक्ष्मीकांत कदम, डॉ.अजय ठाकूर,नरहरी ढोणे,राम पुरी, रामभाऊ चापके,सोमनाथ आप्पा पळसकर, पंकज राठोड, सचिन डहाळे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.शहरात या अभियानाला  मोठा प्रतिसाद मिळत आहे.

You cannot copy content of this page