बस-दुचाकीची धडक चिखलीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Spread the love

दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी;हट्टा पोलीसात घटनेची नोंद

हिंगोली (प्रतिनिधी)

धावत्या बसच्या धडकेत दुचाकीवरील चिखली येथिल एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन,दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.ही घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा शिवारात २० में रोजी घडली आहे.

संजय चौरंगी रा .चिखली असं मयत ईसमाचे नांव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,वसमत तालुक्यातील हट्टा ते झिरो फाटा रस्त्यावर मंगळवारी २० दुपारी हिंगोली आगाराचे हिंगोली -परभणी-हिंगोली बस क्रमांक एम एच १४ एम.एच/ ११०८ व दुचाकी क्रमांक एम.एच /३८/ एस/ ९५ ५६ मध्ये हट्टा झिरो फाटा रस्त्यावर महाविद्यालया समोरील साई पेट्रोल पंपा समोर अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल वरून प्रवास करणारे संजय चौरंगी यांचा जागीच मृत्यू झाला तर  अन्य दुसरा गंभीर असल्याने परभणी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी बस चालकाला तात्काळ अटक करण्यासाठी रस्त्यावर पोलिसांसोबत बाचाबाची करून वाद घातला. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत.घटनास्थळावरील परिस्थिती आटोक्यात आणली.याप्रकरणी पोलीसांनी घटनेची नोंद केली आहे.

You cannot copy content of this page