भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा कंबोडिया सरकारकडून गौरव
पूर्णा ता.६(प्रतिनिधी)
येथिल अ.भा.भिख्कु संघाचे कार्याध्यक्ष तथा पुर्णा बौद्ध विहाराचे विश्वस्त भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा बौद्धमय कंबोडिया देशातील सरकारच्या वतीने संस्कृतिक व धार्मिक विभागाचे मंत्री हे.ई.चेए बोरीन यांनी गौरव केला आहे.
पूर्णा बौद्ध विहाराचे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो हे मागील काही दिवसांपासून धर्म प्रसारासाठी कंबोडिया देशाच्या दौऱ्यावर आहेत.तेथिल बौद्ध लेण्या,संग्रहालय तसेच शासनाच्या अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत.त्यांच्या समवेत भन्ते शिलरत्न तसेच प्रा प्रदिप रोडे आदीं मान्यवर उपस्थित आहेत.२ जुलै रोजी कंबोडिया राजधानीतील मंत्रालयात त्यांना आमंत्रित करून संस्कृतिक व धार्मिक विभागाचे मंत्री हे.ई.चेए बोरीन (H.E. CHAY BORIN) यांच्यासह तेथिल सरकारच्या वतीने भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.












