भरधाव स्विफ्ट कारची दुचाकीला जोरदार धडक..!

Spread the love

पूर्णा-झिरो फाटा रस्त्यावरील घटना; दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)

झिरो फाट्याकडून भरधाव वेगाने पूर्णेकडे येणाऱ्या एका स्विफ्ट कारने एरंडेश्वर कडे जा णा-या  एका दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी या.१३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले या अपघातात दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांवर परभणी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

    ज्ञानदेव बालाजी बोकारे (वय३५), राजू रामचंद्र बोकारे (वय३०)  रा. फुकटगांव ता. पूर्णा जि. परभणी असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यां दुचाकी वरील दोघांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील रहिवासी असलेले ज्ञानदेव बोकारे व राजू बोकारे हे दोघेजण आपल्या दुचाकीवरून दुपारी ३ च्या सुमारास गावाकडून झिरो फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने एरंडेश्वर कडे जात असताना माटेगाव शिवारातील मोतीराम बोबडे यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीला झिरो फाट्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारणे समोरासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी घडलेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यात त्या दोघांच्या डोक्याला हाताला पायाला कमरेला गंभीर स्वरूपाची इजा झाली. अपघात घडतात मानवतावादी नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी एका वाहनाने परभणीकडे रवाना केले त्या दोघांवर परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. सदरील अपघात हा नेमका कशामुळे झाला व कसा झाला. संबंधित कार ही कुठली व कोणाची होती कारमध्ये किती जण प्रवास करत होते त्यामध्ये कोणी गंभीर जखमी झाले का हे मात्र नक्की समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच पूर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे फौजदार आमिरच्या चाऊस घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील शतिक ग्रस्त वाहने हटवून वाहतूक मोकळी करून दिली तसेच घटनेची नोंद पूर्ण पोलीस स्थानकात घेतली असल्याचे समजते.

You cannot copy content of this page