बुद्धीबळ स्पर्धेत विद्याप्रसारणी शाळेच्या ११ खेळाडूंचे यश

Spread the love

जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित

पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)येथिल विद्या प्रसारणी सभा शाळेच्या ११ खेळाडूंनी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत भरीव कामगिरी करत जिल्हास्तरावर होणा-या स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी. यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या पूर्णा तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ  स्पर्धेत विद्याप्रसारिणीच्या ११ खेळाडूंनी विजय संपादन केला आहे.त्या सर्वांची परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजयी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक प्रकाश रौंदळे, सज्जन जैस्वाल यांचा  संस्था अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे, दिलीप देशमाने,पाराशर स्वामी, गणेश कोलगाने,लक्ष्मण सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
सार्थक डाढाळे,अर्चित लोखंडे,अफिरा असद शेख, क्षितिजा  कापसे, प्रणव बोकारे, श्रेया कदम, जानवी काळबांडे, गजानन कदम,विराज गोणारकर, रुद्र स्वामी, साहिल निगडकर असे ११ जणं जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

You cannot copy content of this page