क्रिडा संकुलात क्रिकेट खेळताना झालेल्या वादात चाकुने जिवघेणा हल्ला
पूर्णा शहरातील घटना;जिल्हा क्रीडा अधीका-यांचे दुर्लक्ष;कर्मचारी नसल्याने वाढत आहेत प्रकार; गुन्हा दाखल..
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरातील आनंदनगर भागातील क्रीडा संकुलात क्रिकेट खेळाणा-या एका तरुणावर धारदार चाकूने क्रिकेट खेळताना झालेल्या शुल्लक वादातून जिवघेणा चाकुहल्ला झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी एका जणांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीडा संकुलाकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले असून, कोणताही कर्मचारी तैनात नसल्याने वारंवार घडत असलेल्या घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी खेळाडूंच्या पाल्यांकडून होत आहे .
पूर्णा शहरातील खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काचे क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.शासनाच्या क्रीडा विभागाने आनंद नगर भागातील संकुल मंजुर करुन खो खो, कब्बडी, टेनिस कोर्ट, धावपट्टी, व्हाॅलीबाॅल,लंगडी आदीं अॅथेलटीक्स प्रकाराचे खेळ खेळण्यासाठी मैदाने तयार करुन क्रीडा संकुल उभारले आहे.मात्र या क्रीडा संकुलावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांस तैनात केले नसल्याने येथिल कारभार रामभरोसे सुरू आहे.येथे काही अकॅडमीचे क्रीडा प्रशिक्षक ५ ते १६ वर्षे वयाच्या मुला- मुलींना प्रशिक्षण देत असतात.मात्र येथे कर्मचारी,सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने कोणीही विनापरवानगी येऊन मनमर्जी प्रमाणे येऊन दांगडू करत आहेत.
क्रीडा संकुल येथे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान नसतानाही अनेक जण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर येत आहेत.त्यातुन वादही होताना दिसत आहेत.मागील १० दिवसांपूर्वी एका खेळाडूला स्टंपने मारहाण करण्यात आली होती.त्यानंतर लुकमान रहेमान वली मोहम्मद वय २५ वर्षे रा. अजिज नगर पूर्णा यांच्यावर ता.१३ रोजी क्रिकेट खेळत असताना नुमान शेख मुस्तफा रा.पूर्णा याने वाईट बाल टाकण्याच्या कारणावरून लुकमान याचे आई वर अश्लील भाषेत शिवीगाळ केली.यावरुन दोघांत चांगलीच जुंपली नुमान याने काहीही एक मागेपुढे न पाहता खिश्यातील खटक्याचा चाकु काढुन लुकमान रहमान याचे डाव्या छातीच्या बरगडीवर चाकु खुपसून त्यास गंभीर रित्या जख्मी केले.घटनास्थळी चाकुने जीवघेणा हल्ला झाला. यावेळी एकच खळबळ उडाली.रक्तभंबाळ अवस्थेत लुकमानला काही सोबत्यांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियासाठी हलवण्यात आले.त्याने या प्रकरणी पोलीसांकडे जबाब ता.१५ रोजी नोंदवला आहे.या जबाबवरुन पूर्णा पोलीस ठाण्यात नुमान शेख मुस्तफा यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्रिडा विभागाने असे प्रकार वारंवार घडत असल्याने याकडे लक्ष देऊन कर्मचारी तसेच महीला खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा रक्षक तैनात करावा,खेळाडुंना नियमांनुसार प्रवेश देत ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी पालकवर्गातुन होत आहे