अजदापूर येथे ४० वर्षीय विवाहीतेचा मारहाण करीत पितापुत्रांनी केला विनयभंग..
अजदापूर येथे ४० वर्षीय विवाहीतेचा मारहाण करीत पितापुत्रांनी केला विनयभंग..
चुडावा पोलिस हद्दीतील घटना; गुन्हा दाखल
चुडावा/ प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील अजदापूर येथिल शेतात काम करीत असलेल्या एका ४० वर्षीय विवाहित महीलेला पित्रापुत्रांनी संगणमत करुन तिचा वाइट हेतुने हात धरुन आरोपी व त्याच्या तीन मूलांनी तीला थापड बूक्यानी मारहाण केली शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना गुरुवार ता.४ मार्च रोजी स.९ वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी पुर्णा पिडीत महीलेच्या फिर्यादीवरून पितापुत्र अश्या चार जणांविरुद्ध चुडावा पोलीसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुडावा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे अजदापूर कुंभारवाडी शिवारात पिडीत ४० वर्षीय विवाहित महीलेची शेती आहे.ती महीला गुरुवार ता. ४ रोजी सकाळी ९;३० वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत असताना अजदापुर गावातील आरोपी नामें दगडु निवृत्ती वैद्य व त्याचे मूले नवनाथ दगडू वैद्य, रामा दगडू वैद्य, तिरूपती दगडू वैद्य हे त्या महीलेच्या शेतात जाऊन तीला तु शेतात कशी काय आलीस हे शेत आमचे आहे असं म्हणत दगडू याने व त्याच्या तीन मूलांनी त्या विवाहीतेचा वाईट हेतूने हात धरून तीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.यातील आरोपी व त्याच्या मुलांनी तीच्याशी लगट करत तीला शिवीगाळ करून व जिवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद पिडीत विवाहीत महीलेने चुडावा पोलिस ठाण्यात दाखल केली या फिर्यादीवरून आरोपी दगडु निवृत्ती वैद्य व त्याचे तीन मूले याच्या विरोधात कलम ३५४,३२३,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस जमादार सुर्यकांत केजगीर हे करीत आहेत.