दहावीच्या निकालची पेटारे मंगळवारी उघडणार

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे निकालाचे पेटारे उद्या मंगळवारी (ता. १३) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहेत.

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान जिल्ह्यातील एकूण ९४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून २९ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या परीक्षांचे निकाल उद्या मंगळवार रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या sscresult.mahasscboard.in, sscresult.mkcl.org आणी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून आपला निकाल पाहता येणार आहे. तसेच निकालपत्रक डाऊनलोड देखील करता येणार आहे.

You cannot copy content of this page