पूर्णा ता.२३(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांचा अभिष्टचिंतन सोहळा पूर्णा तालुक्यात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपचे नेते संतोष भाऊ मुरकुटे, रामकिशन रवंदळे यांच्रया उपस्थिती रक्तदान शिबीर तसेच वृक्षलागवड करण्यात आले.पूर्णा तालुका भाजप शाखेचे तालुका अध्यक्ष संजय मोहीते यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडवणीस यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त तालुक्यात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गरजु विद्यार्थ्यांना कपडे वाटप, शालेय साहित्य वाटप, गोमाता पूजन आदीं कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष गंगाखेड विधानसभेचे कणखर नेतृत्व संतोष भाऊ मुरकुटे,प्रदेश सदस्य रामकिशन रवंदळे यांच्या सह मा. सभापती व्यंकटराव देसाई,तालूका अध्यक्ष संजय मोहिते,भाजपा जेष्ठ नेते बळीराम कदम,अनंतराव पारवे, सरचिटणीस रामजी चापके, संतोष बनसोडे ,तालूका उपाध्यक्ष कैलास वाघ ,अशोकराव देसाई, गोपाळराव देसाई, अनुसूचित जाती ता.अध्यक्ष प्रशांत गचे,रावजी हेंडगे, बालाजी शेळके, अंकुश सोन्नटक्के,जळबाजी बुचाले,प्रताप देसाई,गोविंद सरोदे, दिगंबर इंगोले, गजानन दाढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्याचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.