काँग्रेसचे शिष्टमंडळ शनिवारी पुर्णा तालुक्यात;अतिवृष्टी भागाचा आढावा घेणार

Spread the love

खासदार. रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव, यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राहणार उपस्थित

पुर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार परभणी, जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, प्रा. यशपाल भिंगे, श्री. संदीप देशमुख बारडकर आणि श्री. बाळासाहेब देशमुख यांचा समावेश आहे.ही समीती उद्या शनिवारी (ता.२७) रोजी पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी,मुंबर, धानोरा काळे, वझुर, देऊळगाव आदीं भागात पाणी करणार आहे.त्यासह ही समिती परभणी जिल्ह्यातील परभणी व सोनपेठ तालुक्यात देखील दौरा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे शहराध्यक्ष शेख.अहमदभाई यांनी दिली आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे

  • सकाळी 9.30 वा. आहेरवाडी (ता. पूर्णा)
  • सकाळी 10.30 वा. मुंबर (ता. पूर्णा)
  • सकाळी 11.00 वा. देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा)
  • दुपारी 12.00 वा. वझुर (ता. पूर्णा)
  • दुपारी 1.30 वा. उमरी मा. (ता. परभणी)
  • दुपारी 2.00 वा. आनंदवाडी (ता. परभणी)
  • दुपारी 3.00 वा. शिर्शी (ता. सोनपेठ)
  • दुपारी 3.30 वा. लोहीग्राम (ता. सोनपेठ)
  • सायं. 5.00 वा. पत्रकार परिषद

या दौऱ्याची सुरुवात सकाळी ८:३० वाजता पूर्णा शहरातील इंडिया मेडिकल (बसस्थानकासमोर) येथून होणार असून, या दौऱ्यासाठी पूर्णा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवे, शहराध्यक्ष शेख अहमदभाई,आयटी सेलचे निखिल धामणगावे, पांडुरंग कदम यांनी केले आहे.


You cannot copy content of this page