नैसर्गिक आपत्ती; दामिनी व सतेज अँप डाऊनलोड करून घ्यावे – तहसीलदार माधवराव बोथिकर

Spread the love

पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

पूर्णा/प्रतिनिधी:
लवकरच मान्सून सुरू होणार असून नैसर्गिक आपत्तीची माहिती होऊन जीवितहानी टाळण्यासाठी शेतक-यांनी दामिनी व सतेज अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन पूर्णा तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी केले आहे.

दरवर्षी जूनपासून मान्सूनची सुरुवात होत असते. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारांचा पाऊस अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतक-यांची जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतक-यांना येणा-या नैसर्गिक आपत्तीची कल्पना मिळाली तर होणारे नुकसान टाळता येईल, यासाठी शेतक-यांनी प्ले स्टोअर वरून दामिनी व सतेज अँप डाऊनलोड करून घ्यावे. या‌ अँपमध्ये येणा-या नैसर्गिक आपत्तीची माहिती कळते व ते याबाबत सूचना देते. या सूचनेनुसार शेतकरी स्वतः व जनावरांना सुरक्षितस्थळी पोहचू शकतील. या उद्देशाने या अँपची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे सर्व शेतक-यांनी दोन्ही अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून जीवितहानी टाळावी तसेच जनावरांचे येणा-या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार माधवराव बोथिकर. यांनी केले आहे.

You cannot copy content of this page