पूर्णेत गुरुचरित्र पारायण व श्रीदत्त महात्म कथेचे आयोजन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी);

येथील श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प.पु. श्री अखंडानंद सरस्वती (ओक स्वामी) महाराज यांच्या  कृपा आशीर्वादाने श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह चे आयोजन ता.०१ ते ०८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

पूर्णा येथील श्री दत्त मंदिरात मागील ५९ वर्षांपासून गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी १ ते ९ मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,पूजा, आरती, अभिषेक सकाळी ६ वाजता. श्री गुरूचरित्र पोथी वाचन सकाळी ९ ते ११ वाजता., पंचपदी सायं. ७ वाजता. श्री दत्त महात्म पुराण कथा रात्रौ ८ ते ११ वाजेपर्यंत श्री गुरुचरिन्न पोथी वाचक श्री अरविंद गोविंद गुरु जोशी तर श्री दत्त महात्म पुराण कथाकार  श्री ह.भ.प. गंगाधर कुलकर्णी बाळू महाराज नाव्हेकर (गंगाखेड) यांच्या सुश्राव्य वाणीतून महात्म पुराण कथा ऐकायला मिळणार आहे.८ मार्च रोजी श्री गुरू चरित्र पारायण, दत्त महात्म पुराण कथा समाप्ती व महाप्रसाद दुपारी १ ते ४ वाजे पर्यंत. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.,

You cannot copy content of this page