प्रा.दत्ता अंकुश पवार यांचं निधन

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी

येथिल स्वातंत्र्य सनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्राध्यापक दत्ता अंकुश पवार यांचं मंगळवार तारीख 2 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे त्यांचे वय 40 वर्षे होते.

पूर्णा तालुक्यातील वझुर येथील मूळ रहिवासी असलेले दत्ता पवार हे सन 2008 पासून पुन्हा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात इंग्रजी व ग्रंथालय विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे शांत संयमी शिक्षक म्हणून ते सुपरिचित होते. सोमवारी मध्ये रात्री त्यांना छातीत दुखू लागल्याने नांदेड येथे तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तारीख 2 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळ त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूची वार्ता पसरतात गावामध्ये शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी त्यांची मित्रपरिवार नातेवाईक व महाविद्यालयातील सहयोगी संस्थाचालक, प्राचार्य ,प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page