शिंदे गटाचे आ.हेमंत पाटलांवर कारवाई करा; पूर्णेतुन पोलीस महासंचालकांना निवेदन
विधानसभेत त्या वक्तव्याचा आंबेडकरी जनतेतून निषेध
पूर्णा ता. १६(प्रतिनिधी)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेच्या सभागृहात बोलताना खोटे वक्तव्य व दिशाभूल करुन भावना दुखावल्याची माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूर्णेतील समाजबांधवांनी पोलिस महासंचालक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषद सभागृहात (ता.११) जूलै रोजी केलेले वक्तव्य केवळ दलितांच्या भावना दुखावणारेच नाही तर सभागृहाची दिशाभूल करणारे आहे. त्यांच्या खोटारड्या वक्तव्याची दखल घेवून त्यांचे विरुद्ध कठोर कायदेशिर कायवाही करावी. नांदेड जिल्ह्यातील एका लग्नात दलित तरुणाचा खून करण्यात आला. याबाबत व परभणी येथील घटनेबाबत त्यांनी खोटे-विधान केले आहे. या विधानाचा निवेदनात निषेध करण्यात आला आहे. निवेदनावर रिपाई नेते प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, ॲड. धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, प्रवीण कणकुटे, अतुल गवळी, विरेश कसबे, मिलिंद सोनकांबळे, अमृत कऱ्हाळे, त्र्यंबक कांबळे, संजय शिंदे, गौतम काळे, रमेश बरकुंटे, सय्यद कलीम, मोहन लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत