बँक ऑफ महाराष्ट्रच्या अन्यायाविरोधात देवराव खंदारेंचा आमरण उपोषणाचा इशारा

Spread the love

कर्ज मंजुरी, सबसिडी जमा होऊनही दिली नाही कर्जाची रक्कम

पूर्णा (प्रतिनिधी)

कर्ज मंजुरी होऊन,नावे सबसिडी जमा होऊनही कर्जाची रक्कम बँकेने दिली नसल्याने येथिल बसपानेते मा.नगरसेवक देवराव खंदारे हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, पूर्णा यांच्या विरोधात ५ जून रोजी संपूर्ण कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन त्यांनी बँकेस दिले आहे.

पूर्णेतील बसपा नेते देवराव खंदारे यांनी २०११ साली जिल्हा उद्योग केंद्र, परभणी मार्फत खडीमशीन व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज दाखल केला होता, जो मंजूरही झाला होता. बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पूर्णा यांनी कर्ज मंजूर केल्याची माहिती असूनही ते कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
तसेच, दि. २२ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या खात्यात २० लाख रुपये (३५% अनुदानासह) रक्कम जमा झाली असल्याची माहिती असूनही, सदर रक्कम मिळाल्या बाबत कोणतीही अधिकृत माहिती बँकेने दिली नाही, तसेच अनुदानाचा लाभही त्यांना मिळू दिला नाही, असा गंभीर आरोप खंदारे यांनी केला आहे.

खंदारे यांचा दावा आहे की, जर योग्य वेळी कर्ज मिळाले असते, तर त्यांनी आजपर्यंत ते फेडले असते आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली असती. मागासवर्गीय असल्याने सरकारकडून मिळालेली ३५% सबसिडी बँकेला मिळाली मात्र प्रत्यक्ष लाभार्थ्याला नाकारण्यात आला, असे त्यांनी निवेदनात नमूद केले., २० जून २०२४ व १४ मे २०२५ रोजी त्यांनी अर्ज देऊनही बँकेकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा उत्तर मिळाले नाही, उलट उडवाउडवीची उत्तरे देत त्यांच्या समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या. या प्रकारामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला, असेही त्यांनी सांगितले.शेवटी नाईलाजास्तव दि ५ जून रोजी पासून बँकेसमोर बेमुदत आमरण उपोषणास सर्व कुटुंबासह बसत आहोत. या उपोषणादरम्यान आमच्या जीवितास काही वाईट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी बँकेवर राहील,” असा इशारा खंदारे यांनी निवेदनात नमूद केला आहे.आता बँक प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page