पुर्णा ता.१(प्रतिनिधी)येथिल जवाहरलाल नेहरू इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले आहे.विजयी खेळाडूंचे सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परभणी जिल्हा क्रिडा अधिकारी व क्रिडा संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे नुकत्याच भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेंसाठी जिल्ह्यातील अनेक संघांनी हजेरी लावली होती.या स्पर्धेत पुर्णा येथिल जवाहरलाल नेहरू इंग्रजी शाळेच्या अजितसींग बायस, धनंजय भाकरे, पियुष राठोड,श्लोक अग्रवाल आदींनी नेत्रदीपक कामगिरी बजावत जिंतूर ,परभणी संघांला धुळ चारली.एकुण ४ विजय मिळवून दिले. अंतिम सामन्यात मानवत विरुद्ध पुर्णेच्या संघाची लढत झाली यात पुर्णेचा संघांने प्रथम स्थान पटकावले आहे.या स्पर्धेत बॅडमिंटन संघटनेचे पंचांनी काम पाहिले.संघाच्या विजयाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे, श्रीनिवास काबरा, मुख्याध्यापक आतिया मॅडम यांनी खेळाडूसह प्रशिक्षक धरमसिंह बायस यांचे अभिनंदन केले आहे.