विद्या प्रसारिणी शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
पूर्णा ता.१९(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.१७)सप्टेंबर रोजी शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल व मल्लखांब स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पूर्णा येथील विद्या प्रसारिणी शाळेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळविला असून त्यांच्या निवडी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.

बास्केटबॉल (मुले-१७ वर्षे गट) संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघात रुद्राक्ष टेकाळे (कर्णधार), प्रतीक गायकवाड, शेख झिशान शेख मोहसीन, शैलेश सरोदे, सय्यद अरसलान सय्यद रशीद, अब्दुल अयान अब्दुल खादर, धम्मपाल खर्ग खराटे, सम्यक ढाकरगे, प्रदीप रावळे, विराज यशके, तेजस काळे, शेख रफिक उद्दीन शेख मजरुद्दीन या खेळाडूंचा समावेश आहे.

मल्लखांब (मुले१७ वर्षे गट) या स्पर्धेत आयुष काळे, तेजस काळे व सुबोध कापुरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळविला.विजयी खेळाडूस क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे, क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल व संघाचे कोच शंभू गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.