जिल्हा व तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत पुर्णेतील श्री.गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या फुटबॉल व कब्बडी संघ अव्वल..!
शिरपेचात रोवला मानाचा तुरा;जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत पुर्णेच्या खेळाडूंचे वर्चस्व
पूर्णा ता.८ (प्रतिनिधी): Parbhani Purna Sports Newsपरभणी येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुर्णा येथील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करून विजेतेपद पटकावले. यामुळे संघाने आगामी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे ही स्पर्धा (ता.८)रोजी पार पडली. प्रशिक्षक प्रा.सतीश बरकुंटे यांच्या मार्गदर्शना खाली Shri Gurubuddhiswami Mahavidyalaya Purna पुर्णेच्या श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या फुटबॉल संघांतील नवोदित खेळाडूंनी पहिल्या फेरीपासूनच उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरी गाठली या फेरीतही सांघी खेळाच्या जोरावर मैदानावर वर्चस्व गाजव जिल्हा ज्येत्येपद पटकावले.संघातील खेळाडूंमध्ये वेदांत मंण्यालिकर,प्रथमेश अहिरे,सय्यद हमजा,रोहन हटकर, प्रणय लोखंडे,शिवराजसिंह ठाकूर,किशोर दुंडिनर,यश चित्ते,यश खंडागळे, नकुल राजभोज,शब्द खंडागळे,सुमेध वाव्हळे, ्संकेत हटकर,सम्यक इंगळे, मोहम्मद कैफ,अवनीश एकलारे,यादव हर्षवर्धन व श्रीनाथ वैद्य यांचा समावेश होता. तर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाच्या दोन्ही (मुले व मुली) संघाने तालुक्यात प्रथम क्रमाक पटकावला. या मुलांच्या संघातील विद्यार्थी. राम जगताप, ओमकार वाळवंटे, कृष्णा बोबडे, गणेश सोलव, करण बोबडे, बालाजी वैद्य, ज्ञानदेव अंभोरे, नागेश क्षीरसागर ,कृष्णा आंभोरे, अजित नरवडे, समीर बेकटे, सोलव श्रीकांत. व मुलींच्या संघातील विद्यार्थिनी सुरेखा पवार, त्रिवेणी शेंडेराव, ऋतुजा थोरात, प्रतिमा राऊत, प्रणाली राऊत, संध्या वाघमारे, पूनम पांचाळ, वैष्णवी शिंदे ,अश्विनी वाघमारे, साखरे धोंडीबा, पुनम रोडगे, लक्ष्मी कुलकर्णी.विजयी संघाची पाथ्री येथे होणा-या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे,सचिव अमृतराज कदम,सहसचिव प्रा.गोविंदराव कदम,प्राचार्य डॉ.के.राजकुमार,उपप्राचार्य डॉ.शिवसाब कापसे,डॉ.गजानन कुरूदंकर, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी, उपप्राचार्य चारुदत्त डाफणे, कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब कुलकर्णी यांच्या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.संघाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून आगामी विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.