डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खांबेगांव ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

प्रज्ञासुर्य, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी पूर्णेत भीमसागर उसळला होता. आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला मोहित करणाऱ्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरातसह तालुक्यातील नागरिकांनी पूर्णेत गर्दी केली होती. तालुक्यातील खांबेगाव येथिल शिवसेनेचे युवा नेते बापु शृंगारपुतळे, सरपंच गजानन कदम राजीव खंदारे हे ग्रामस्थांच्या वतीने पुष्प अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात पुर्वसंध्येला पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भिमसैनिक जमले होते मध्यरात्री १२ वा मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . दुसऱ्या दिवशी सकाळी धम्मध्वजारोहण सामुहिक वंदना, भव्य मिरवणूक या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खांबेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गजानन कदम, शिवसेना युवा नेते बापु शृंगारपुतळे राजीव खंदारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत अभिवादन केले.

You cannot copy content of this page