डाॅ.गुलाबराव इंगोले हस्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित..
पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) : देण समाजाचं परिवाराच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणारे डॉ. गुलाबराव इंगोले यांना राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत पूणे येथे हस्ती जीवन गौरव पुरस्कार शनिवारी (ता. २६) प्रदान करण्यात आला. यावेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, कैलास जैन, आर.डी पाटील, कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर, दादासाहेब सोनवणे, नानासाहेब लडकत, दीपक पाटील, सुभाषराव सोनवणे, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.