पुर्णेत ओला दुष्काळ जाहीर करा आ.डॉ. गुट्टेकाका मित्र मंडळाची मागणी

Spread the love

तहसीलदारांना दिले निवेदन

पुर्णा ता.२०(प्रतिनिधी)

तालुक्याला अतीवृषीच्या पावसाने थैमान घातले, हजारों हेक्टरवरील उभी पीकांचे नुकसान झाले, जागोजागी पशुधन दगावले.पावसाने खरीप हंगाम हातचा गेला.यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे हित जोपासत ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी पुर्णा शहर व तालुक्यातील आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.(ता.२०) रोजी तहसीलदार पुर्णा यांच्याकडे निवेदन दिले आहे.

तालुक्यातील बहुतांश भागात अतीवृष्टीचा पाऊस झाला.यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच पशुधनाची देखील हानी झाली आहे.या अचानक ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या उध्वस्त होणार आहे.तालुक्यातील सर्व गावामध्ये प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तातडीने नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी शेतक-यांच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करून आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर पुर्णा तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, तालुका अध्यक्ष साहेब देसाई, शहराध्यक्ष अँड राजेश भालेराव, अँड गोविंद ठाकुर ,उत्तम ढोणे, विक्रम गव्हाळे, साहेब भाकरे,विश्वनाथ होळकर, किशोर सूर्यवंशी, यांच्या सह ३० ते ४० कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page