राष्ट्रीय शिक्षण-२०२० धोरणाससाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे-प्राचार्य डॉ. विकास सलगर
पूर्णा(वार्ताहर)
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० लागु होणार आहे.या धोरणातील नव्या बदलांना स्वीकारून अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे असं आवाहन परभणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायटचे प्राचार्य डॉ.विकास सलगर यांनी केले.
पूर्णा येथील अभिनव विद्या विहार शाळेतराष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात इयत्ता पहिली ते बारावी वर्गांना शिकवणाऱ्या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू आहे.या प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.यांनी भेट दिली.यावेळी ते बोलत होते.या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा ता.१७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी पर्यंत होणार आहे.पुढे बोलताना डॉ.सलगर म्हणाले की,बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी अशा आहेत की त्या टक्केवारीत मोजता येत नाहीत .त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावे. प्रसंगी कार्यक्रमास अधिव्याख्याता राम नाईकनवरे यांनीही भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव टिमके , योगेश देशमुख प्रशिक्षण प्रमुख श्री रवींद्र हनुमंते यांनी जबाबदारी सांभाळली तर सुलभक म्हणून व्यंकट रमण जाधव, अनिल ढाले, डॉ .अमोल देशपांडे, डॉ. संतोष सेलुकर, संतोष रत्नपारखे, आनंद जाधव, मारुती कदम, राजू पांचाळ, विलास बोकारे, कातकडे श्रीमती सारिका गिरी, प्रतिमा मसारे, राधा भिसे, डॉलेश्वरी डिब्बे, आदींनी काम पाहिले.