ऐन पावसाळ्यात पुर्णेकरांवर टँकरने पाणी खरेदी करण्याची वेळ
शहरात १५ दिवसांपासून निर्जळी; पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभाराचा कळस
पूर्णा ता.१९(प्रतिनिधी);पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य भोंगळ कारभाराचा कळस झाल्यामुळे, नदी उशाला असुन, देखील ऐन पावसाळ्यात पुर्णेकरांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.या प्रकारामुळे जनतेतुन रोष व्यक्त केला जात आहे.पालीकेने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पूर्णा पालीकेचा पाणीपुरवठा पुरवठा मागील १५ ते २० दिवसांपासून बंद पडला आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पुर्णा नदीच्या नदीपात्रात पालीकेचे जॅकवेल आहे.येथिल ७५ एचपीच्या मोटारीतील पंप गाळात फसुन,बिघाड झाल्याचे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.दरम्यान शहरात नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागतो आहे.नागरीक भर पावसात टँकर विकत घेऊन धड भागवत असल्याचे चित्र आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण नागरिकांनी पाण्याविना साजरा केला.काही दिवसांवर गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. पूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीवरील कोल्हापूर बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. मोटारीत बिघाड होण्याची वर्षभरातील ३ री घटना आहे.लाखों रुपये खर्च करूनही थातुरमातुर पद्धतीने मोटर दुरुस्ती केली जाते. इमर्जन्सी काळासाठीची मोटारही पाणीपुरवठा अभियंता यांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे खितपत पडली आहे.यामुळेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यात व कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही, पाणी सोडण्याचे नियोजन नाही,पाणी नदीपात्रातील बंधाऱ्यात घेण्यासंबंधीत नियोजन नसल्याने वारंवार निर्जळी निर्माण होत आहे.मुख्याधिका-यांनी याकडे लक्ष देऊन कामचुकार कर्मचारी अभियंत्याला कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली लाखों रुपये लाटले..?
पालिकेने जॅकवेलवर शेकडो एचपीच्या भल्या मोठ्या मोटारी घेतलेले आहेत. त्या मोटारी जळाल्यानंतर पालिकेत त्यांचे दुरुस्ती करून घेते त्यासाठी लाखो रुपये ही खर्च केले जाते येतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयाची बिले उचलतात आहे मात्र पैसा खर्च करूनही म्हणावे तसे काम होत नसल्याने केलेल्या खर्चावर आणि कामावर साशंकता निर्माण होते आहे. मोटार दुरुस्तीच्या नावाखाली लाखों रुपये कर्मचाऱ्यांनी लाटले असल्याची चर्चा जोरदार चर्चा पालीका वर्तुळात आहे..यामुळे खरंच की काय मोटार दुरुस्ती करणारे खाजगी मेकानिक व कर्मचाऱ्यांचे "आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा"अशी तर गत झाली नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.ते काहीही असोत एकवेळा मुख्याधीका-यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची खातेनिहय चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
आंदोलनाचा ईशारा....!
पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे.नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही, विभागाचे पाणी सोडण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.अभियंता कर्मचा-यांचा मनमानी कारभार सुरू आहे.दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपयांचे बिल कर्मचारी गिळंकृत करत आहेत.नागरिक ऐन पावसाळ्यात ट्रॅक्टरचे पाणी विकत घ्यावे लागते आहे.पालीकेने तातडीने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा ईशारा (उबाठा) शिवसेना उपशहरप्रमुख शंकर गलांडे यांनी दिला आहे.
पुर्णा नदीच्या पुराचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता..
पुर्णा पालीकेच्या सुत्रांकडून मिळत असलेल्या माहीती नुसार, मोटार दुरुस्ती बुधवारी पुर्ण झाली आहे.साहीत्य पालीकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जमा झाले आहे. मात्र पुर्णा व थुना नदी दुथडी भरून वाहत असल्याने मोटार बसवण्यासाठी नैसर्गिक अडचणी येत आहे.नदीचे पाणी ओसरल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.












