दंगा,मस्ती,मनमुराद खेळ,नर्सरी ते पहीलीच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद;लार्स शाळेच्या चिमुकल्यांनी अनुभवली शाळेची सहल..

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
स्व.रामभाऊ शिवराम सोनटक्के पब्लिक स्कूल( लार्स
इंग्लिश स्कूल )पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी या शाळेची दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्सरी ते १ ली वर्गाच्या ४ ते ६ वर्ष वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पार पडली.
   शाळेला शैक्षणिक वातावरणात बदल म्हणून एखाद्या दिवशी बालगोपाळांना दंगा,मस्ती, खेळ, जादुचाखेळ ,हॉर्स रायडिंग,जेवण,नाष्टासह कृषी पर्यटनाचाही मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी येथिल लार्स इंग्लिश स्कूलच्या वतीने मराठवाड्यात अल्पावधीतच प्रसिद्धी  झोतात आलेल्या परभणी शहराजवळील सरदेशपांडे यांच्या हुरडा पार्टी फार्म हाऊसवर बुधवार दि.२२ जानेवारी रोजी शाळेच्या ४ ते ६ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची शालेय सहली आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी खेळा सह,हॉर्स रायडिंग , घोडागाडी व कृषी पर्यटनासोबत हुरडा पार्टीचा मनसोक्त आनंद घेतला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका बबीता सोनटक्के मिस यांनी सांगितले की,लार्स इंग्लिश स्कूल विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अभिनव उपक्रमांचे आयोजन करत असते त्यामुळे अगदी लहान वयाच्या मुलांना त्याचा फायदा होतो त्याचाच एक भाग म्हणून.शैक्षणिक सहलींचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. पार पडलेल्या सहलीत लुसी मिस,मनिषा मिस, सुजाता गायकवाड मिस, भालेराव मिस,हानवते मिस,खरात मिस,अनिता सोनटक्के मिस, ढोणे मिस, टाकळकर मिस,योगीता सोनटक्के मिस,पत्रे मिस,मोरे मिस, सुजाता वाघमारे मिस,स्वामी मिस, सुर्यवंशी मिस, सोनवणे मिस,गौरी दिदी,उषा दिदी आदींनी परिश्रम घेत सहल निर्विघ्नपणे यशस्वी केली.

You cannot copy content of this page