रमजान ईद निमित्त विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी):

इस्लाम धर्मातील पवित्र महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवार ३१ मार्च रोजी  ईद-उल-फित्र निमित्त  मुस्लीम समाजाने देशातील शांती तसेच विश्वकल्याणसाठी सामूहिक प्रार्थना करून अत्यंत हर्षोल्हासाच्या ईद साजरी केली.      

 पूर्णेत मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रकाशदादा कांबळे मा.नगराध्यक्ष विशाल कदम ,गटनेते उत्तमभैय्या खंदारे,आदीं मान्तयवरांसह प्रशासनाकडून तहसीलदार माधवराव बोथिकर,नायब तहसीलदार प्रशांत थारकर,डिवाएसपी डॉ समाधान पाटील,पालीका लेखापाल रामराव पवार,,प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि पत्रकार यांनीही ईदगाह येथे हजेरी लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर इमाम शमीम रिजवी यांनी देशाच्या एकता आणि शांततेसाठी विशेष दुवा केली. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली होती. तसेच नमाज पठणाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती.    

 रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी पारंपरिक शिरखुर्मा आणि विविध गोड पदार्थ तयार करून आप्तस्वकीय व मित्रपरिवारासह त्याचा आनंद घेतला. ईदच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन स्नेहभाव आणि बंधुतेचा आनंद लुटला. ईद निमित्ताने लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. ईद निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.

You cannot copy content of this page