खांबावर चढून काम करणाऱ्या ईसमाचा मृत्यू
महीनाभरातील दुसरा बळी; यंत्रणांकडून हात झटकण्याचे प्रयत्न
पूर्णा(प्रतिनिधी)
विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय ईसमाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.विज मंडळ क्षेत्रातील पूर्णा येथील जेमतेम एक महीन्याच्या अंतरातील हा दुसरा बळी होय.या संदर्भात संबंधित यंत्रणांकडून पुर्णतः हात झटकले जात असुन, संभ्रमाची निर्माण करण्याचा प्रकार दिसून येत आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,ता.१९ फेब्रुवारी बुधवारी पूर्णा शहरातील कमाल टाॅकीजच्या जवळ एका विजेच्या खांबावर एक व्यक्ती कामाच्या उद्देशाने खांबावर चढला त्यास अचानक विजेचा धक्का बसुन तो व्यक्ती खाली कोसळला.बेशुद्ध व गंभीर जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला जवळच असलेल्या एका खासगी दवाखान्यात नागरिकांनी नेले.येथे प्रथमोपचार करून त्याला नांदेड येथे पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला सदर व्यक्ती तालुक्यातील कंठेश्वर येथिल असुन संतोष पंडीतराव जाधव वय ४५ असल्याची माहिती हाती आली आहे.
येथील महावितरण कार्यालया अंतर्गत जानेवारी महिन्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कामगाराचा विजेच्या खांबावर अचानक विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.त्या पाठोपाठ ही सलग दुसरी घटना पूर्णा शहरात घडल्याचे समोर आले आहे.मयत व्यक्ती हा मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करत असे,सद्य स्थितीत तो कंत्राटी कामावर म्हणून कार्यरत होता की नाही या बाबत अधिककृत माहीती मिळाली नाही.सदर यंत्रणेतील काही जणांकडून याबाबत हात झटकण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसते.
यंत्रणेचा जीवाशी खेळ..?
- विज मंडळात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने विविध कामांसाठी कंत्राटी पद्धतीचा आधार घेतला जातो.त्यात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची सुरक्षा,राम भरोसे ठरते. आवश्यक साधन सामुग्री असो की अन्य सुविधा बाबत यंत्रणेतील अनेकांचे याकडे दुर्लक्ष होते.काही वेळा लेखी तर काही वेळा तोंडी स्वरुपात आदेशावरून सदर कामगार कामे करतात.अशा स्थितीत दुर्घटना घडल्यास यंत्रणा नामनिराळी राहाते व कामगार जीवानिशी जाऊन त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते.या स्थितीत सदर प्रकरणाची सखोल चौकशीची गरज व्यक्त होत आहे.अधीकृत परवानगी शिवाय कंत्राटदार कोणाकडून कामे करुन घेतात काय याची विशीष्ट यंत्रणा कार्यान्वित असण्याची आवशक्यता आहे.या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेतील कुटुंबीयांना कोणता व कशी मदत मिळते या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चौकशी करून माहिती देऊ-उप कार्यकारी अभियंता पूर्णा
- सदरील प्रकरणात मयत झालेल्या ईसमा बाबत येथिल उप कार्यकारी अभियंता रामगीरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटना घडली त्या दिवशी शहरात शिवजयंती उत्सव मिरवणूक असल्याने कोणीही भार नियमन करु नये अथवा विज पुरवठा बंद करु नये अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या.मयताला किंवा मयताने संबंधित यंत्रणेला कामाबाबत कोणतीही खबर दिली नव्हती कदाचित कोण्यातरी एका ग्राहकाच्या खाजगी सांगण्यावरून सदर व्यक्ती विज खांबावर चढला असावा.या घटनेचा विज मंडळाशी संबंध नाही.दरम्यान सदरील व्यक्ती हा काही महिन्यां पुर्वी आऊटसोर्सिंग कर्मचारी म्हणून कार्यरत होता.परंतु सध्य स्थितीत त्यास कामावरून कमी करण्यात आलेले होते अशी माहिती आहे.या बाबत चौकशी करून अधिक माहिती देऊ असे यांनी स्पष्ट केले.