कलेक्टर,एसपी साहेब आम्हाला न्याय द्या;अवैध दारू विक्री बंद करा;महीला आक्रमक

Spread the love

दारू बंदीसाठी पूर्णा तालुक्यातील लिमला येथे महीला एकवटल्या; जिल्हा प्रशासन,दारुबंदी विभाग व पोलीसांविरुद्ध आक्रमक पवित्रा;आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

पूर्णा (ताडकळस)ता.३०(प्रतिनिधी)

    देशी, विदेशी दारू विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अधीकृत अनुदप्ती नसताना दारुबंदी विभाग व स्थानिक पोलीसांच्या कृपा अर्शिवादाने तालुक्यातील लिमला परिसरात अवैध दारू विक्रीला मोठं उधाण आले आहे. याविरोधात लिमल्यातील रणरागिणी एकवटल्या आहेत.ता.३० रोजी परिसरातील महीलांनी बैठक घेऊन परिसरातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी एक ठराव घेत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.महीलांच्या आक्रमक पणापुढे ग्रामपंचायतीच्या वतीनेही दारुबंदीचा ठराव मंजूर करुन दिला आहे. जिल्हाधीकारी तसेच पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

      पूर्णा-परभणी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या लिमला परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध देशी विदेशी दारू विक्री सुरू आहे.त्याचा त्रास येथील महिलांना,विद्यार्थीनींना  सहन करावा लागत आहे.तर या दारु मुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. याबाबत दारुबंदी विभाग सह स्थानिक तहसीलदार, पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. यामुळे आक्रमक झालेल्या महीलांनी आता कंबर कसली आहे.ता.३० रोजी शेकडो महीला एकत्र येऊन परिसरातील होत असलेली दारु विक्री तसेच धाब्या वरील दारु विक्री बंद करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर केला आहे.त्यांच्या आक्रमक पणाचा प्रत्यय ग्रामपंचायतीच्या सदस्यांनाही आला त्यांनी तातडीने ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू विक्री बंद करावी असा ठराव संमत करून महीलांना सुपुर्द केला आहे.

लिमला व परीसरात मागील काही दिवसांपास अवैध देशी दारूसह, वाळू वाहतूक, मटका जुगार, इत्यादी अवैध धंद्यांनी कळसच गाठला आहे. या अवैध देशी दारूमुळे कित्येक जनांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर प्रशासन याकडे काना डोळा करीत आहेत.त्यामुळे संतापलेल्या महीलांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता गळ घालून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.न्याय न मिळाल्यास महीला आंदोलन छेडण्याचा तयारीत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page