Parbhani;माजी मंत्री बच्चु कडूंच्या १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तीन हक्कसभा-जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने
परभणी,सोनपेठ,सेलुतील सभेसाठी नियोजन बैठक;शेतमजूर, शेतमजूर, मेंढपाळ व मच्छीमार सहभागी होणार
परभणी ता.३१( प्रतिनिधी) : Parbhani Prahar Janshakti Party News माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे (ता.१४) सप्टेंबर रोजी परभणी येथे शेतकरी, शेतमजूर,मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासह परभणी जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग व शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी परभणी, सोनपेठ,सेलु येथे ३ जाहीर हक्कसभा घेणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे.
परभणी येथील सावली शासकीय विश्रामगृहावर(Ex Minister Bachchu Kadu)बच्चू कडू यांच्या आगामी दौऱ्याचे व सभांचे नियोजन करण्यासाठी रविवारी(ता.३१) पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परभणी तालुक्यात एक, सोनपेठ तालुक्यात एक व सेलू तालुक्यात ग्रामीण भागात एक अशा तीन हक्कसभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. या सभेचे ठिकाण व बच्चु कडू यांचा नियोजित दौरा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, परभणी तालुका प्रमुख उद्धव गरुड, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, सोनपेठ तालुकाप्रमुख अशोक म्हस्के, पूर्णा तालुका प्रमुख शिवहर सोनटक्के, मानवत तालुका प्रमुख माणिक राठोड, पाथरी महिला आघाडी तालुका प्रमुख संगीताताई गायकवाड, परभणी शहर प्रमुख अंकुश गिरी, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, प्रहार ऑटो संघटनेचे शहर प्रमुख शंकर दामोदर, शहर सचिव वैभव संघई, सर्कल प्रमुख सूर्यकांत आगलावे, सुभाषराव जोगदंड, बालाजी पौळ आदींची उपस्थिती होती.












