पुरोगामी विचारसरणीचे मा.मंत्री सुरेशराव वरपुडकर भाजपात..!

Spread the love

मंगळवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झाला पक्षप्रवेश सोहळा

परभणी,ता.२९(प्रतिनिधी)

मागिल चार ते पाच दशकांपासून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,(Congress NCP)पक्षात राहून परभणी जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणीची कास धरणारा नेता म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष (Ex Minister Suresh Warpudkar)माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, यांनी आज मंगळवारी (ता.२९) रोजी त्यांचे सुपुत्र समशेर वरपुडकर, स्नुषा तथा सौ.प्रेरणा वरपुडकर तसेच शेकडो समर्थकांसह मुंबईत भाजप(BJP)प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मेघना बोर्डीकरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील मा.मंत्री तथा सुरेशराव वरपुडकर हे काँग्रेस पक्ष सोडणार अशी जिल्ह्यात जोरदार चर्चा होती.आज मंगळवारी त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत भाजपाच्या प्रदेश पक्ष कार्यालयात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपल्या समर्थकांसह भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी आमदार संजय केनेकर ,विक्रांत पाटील, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, माजी जिल्हाध्यक्ष संतोषराव मुरकुटे, डॉ. केदार खटींग, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे रामकिसन रौदळे व बाबासाहेब जामगे, दिनेश नरवाडकर ,विजय अग्रवालआदी उपस्थित होते.भाजपाच्या नेतेमंडळींनी वरपुडकर व त्यांचे समर्थक यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून पक्षात स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना वरपुडकर म्हणाले की,राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, शेतमजूर, कामगारांसह सर्व जाती, धर्माच्यालोकांना सोबत घेऊन यशस्वी वाटचाल करत आहेत. आपण आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करुन परभणी जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ना. फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना. मेघना ताई बोर्डीकर यांच्याकडून आपल्या कार्यकत्यांना ताकद मिळावी, एवढीच अपेक्षा आहे.असल्याचे माजी आ. सुरेश वरपूडकर म्हणाले.

You cannot copy content of this page