माजी आमदार विजय भांबळेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्षप्रवेश

Spread the love

शरद पवारांना धक्का;माजी आमदार विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

परभणी ता.३०(प्रतिनिधी)

Vijay Bhamble शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिंतुर-सेलु मतदारसंघातील माजी आमदार विजय भांबळे हे उद्या अधिकृतरित्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.विजय भांबळे (Vijay Bhamble) यांनी सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामागे नवाब मलिक यांचे प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून माजी आमदार भांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र त्यास अनेक दिवसांपासून मुहूर्त मिळत नव्हता. आता मुंबई येथे एका कार्यक्रमात उद्या दुपारी माजी आमदार विजय भांबळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशासाठी ते मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत.

मागील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सुरेश नागरे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या देखील चर्चा रंगत होत्या. भांबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ते आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत देखील मोठी चुरस पहावयास मिळणार आहे.

You cannot copy content of this page