मा.नगरसेवक सुनिलभाऊ जाधव आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;४२५जणांनी घेतला लाभ.!
टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा
पूर्णा ता.५ (प्रतिनिधी) : पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप व एशियन व्हॅस्क्युलर हॉस्पिटल, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा येथे मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४२५ नागरिकांनी नोंदणी करून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले.असल्याची माहिती माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी दिली आहे.

पुर्णा शहरातील हरिनगर, पंचशील नगर, रेल्वे वसाहत परिसरातील नागरिकांसाठी टायगर ग्रुपचे महाराष्ट्र सदस्य तथा माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी (ता.५) रोजी रविवारी रेल्वे इन्स्टिट्यूट, येथे कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते.यावेळी अध्यक्षस्थान ज्येष्ठ रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे रिटायर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कांबळे, टायगर ग्रुप परभणीचे महेश भाऊ कदम, अर्जुन भाऊ राऊत, तारंग भाऊ स्वामी उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत सुरेश हाटकर, कॅप्टन अमजद भाई, यशवंत लांबसोंगे, प्रभाकर काशिदे, शंकर चव्हाण, देविदास साळवे, केसरबाई यादव आदींचा समावेश होता.

शिबिराकरिता हैदराबाद येथून विशेष उपस्थिती लाभलेले तज्ञ डॉक्टर डॉ. स्वाती जे (MBBS, MCH), डॉ. मोहनाचार्य चारी (MD, MS व्हॅस्क्युलर सर्जन), डॉ. कृपा व डॉ. करवंदे (MBBS पूर्णा) यांनी हाडांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, CABG, डायलिसिस, क्रोनिक स्ट्रोक, स्नायूसंबंधी आजार, मूत्राशयाचे विकार, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस इत्यादी गंभीर आजारांवर तपासणी करून नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले.
शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात ४२५ नागरिकांची नोंदणीसह तपासणी करून झाली.शिबिर यशस्वी करण्यासाठी सुरेश बगाटे, भगवान शिंदे, बबलू जाधव, उमेश जाधव, विशाल राजकुंडल, करण माने, सुरज जाधव, अनिल नारायणकर, विशाल जाधव, नितीन जाधव, एड. सिद्धू येगडे, सुधीर जाधव, नेमीचंद माने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक व माजी नगरसेवक सुनीलदादा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रौफ कुरेशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेश जाधव यांनी केले.या यशस्वी चिकित्सा शिबिरामुळे नागरिकांना मोफत तज्ञ उपचार व आरोग्य सल्ला मिळाल्याने समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.