Exclusive एसबीआय बँकेवर दरोडा;२१ कोटींहून अधिक मुद्देमाल लुटला..!

Spread the love

कर्नाटकच्या विजापूर येथील चढुन शाखेतील थरार;मुखवटेधारी तिघांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेऊन एक कोटी रोकड व २० किलो सोने घेऊन पलायन

महा समाचार विशेष (प्रतिनिधी) : SBI Bank Robbery News तिघा मुखवटेधारी दरोडेखोरांनी पिस्तूल व चाकूच्या धाकावर Sbi बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओलीस धरले आणि १ कोटी रुपयांची नगदी रोकड व २० किलो सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. विजयपुरातील चडचन येथील भारतीय स्टेट बँक (SBI) शाखेत ही घटना मंगळवारी (ता.१६) रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी विजापूरच्या चडचण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी विशेष दखल घेत.सर्वयंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती आहे.या थरारक घटनेने कर्नाटकभरात खळबळ उडाली आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बँकेवर इतक्या मोठ्या प्रमाणावर दरोडा पडल्याने पोलीस यंत्रणा हादरली आहे.

कर्नाटकच्या विजापूर येथील चडचन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सशस्त्र मुखोटाधारी दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना ओलीस धरुन सिनेस्टाईल १ कोटी रुपयांची नगदी रोकड व सुमारे २० ते २१ किलो सोन्याचे दागिने असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.घटनेची माहीती मिळताच कर्नाटक पोलीस खडबडून जागे होत धावाधाव करु लागले.घटनास्थळी पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी पोहोचले. तपासात दरोडेखोरांनी बनावट नंबरप्लेट असलेली गाडी वापरल्याचे उघड झाले. आरोपी महाराष्ट्रातील पंढरपूरच्या दिशेने पळाल्याची शक्यता आहे.पोलिसांच्या मते हे व्यावसायिक गुन्हेगार असून त्यांना बँकेच्या सुरक्षेचे व कामकाजाचे बारकावे माहित होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरु आहे.हा दरोडा केवळ बँकेवरचा हल्ला नाही तर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेला दिलेले उघडे आव्हान आहे. आरोपींना सापळ्यात अडकवून कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांचा सिद्धरमैया यांचा इशारा

कर्नाटकचे CM Siddharamyyaमुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना “कठोर कारवाई करा, आरोपींना लवकरात लवकर पकडा” असे आदेश दिले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक नेमले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेत भीतीचे वातावरण

शांत मानल्या जाणाऱ्या विजयपुरात झालेल्या या दरोड्यामुळे नागरिकांत भीतीचे सावट पसरले आहे. बँक कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून इतका मोठा माल लुटल्याने लोक स्तब्ध झाले आहेत.

You cannot copy content of this page