नांदेड विभागातुन धवणा-या गांड्यांना वाढीव डब्बे
पनवेल, पुणे व अम्बअंदुरा एक्सप्रेसच्या डब्यांची वाढ
पूर्णा(प्रतिनिधी)
उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड -पनवेल,नांदेड- पुणे एक्सप्रेसमध्ये दोन डब्यांची तर नांदेड -अंबा अंदुरा एक्सप्रेसमध्ये तीन डब्यांची कायम स्वरुपी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल,पुणे आणि आंम्ब अंदुरा मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांची सोय होणार आहे.
गाडी क्रमांक 17614 / 17613 नांदेड – पनवेल – नांदेड एक्स्प्रेसमध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकूलीत दोन डब्बे 1 मे पासून आणि पनवेल येथून 2 मे पासून वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता डब्यांची एकूण संख्या 17 एवढी झाली आहे. तर गाडी क्रमांक 17630 / 17629 नांदेड – पुणे – नांदेड एक्स्प्रेसमध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्बे 3 मे पासून आणि पनवेल येथून 4 मे पासून कायम स्वरुपात वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता डब्यांची एकूण संख्या 17 एवढी झाली आहे. आणी गाडी क्रमांक 22709 / 22710 नांदेड – अंबा अंदुरा – नांदेड एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकूलित व 2 द्वितीय श्रेणी शयन यान असे तीन डब्बे नांदेड येथून आज 29 एप्रिल पासून व अंबा अंदुरा येथून 1 मे पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे आता डब्यांची एकूण संख्या 18 एवढी झाली आहे.
नांदेड, पुणे आणि अंबा-अंदुरा या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे.