रानडुक्कराचा हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Spread the love

पूर्णा शिवारातील घटना;वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

पूर्णा(प्रतिनिधी). दि. 04 एप्रिल

शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारातील गणेश देविदासराव कदम जी.डी.मामा (वय ७२) वर्षे या शेतकऱ्यांवर शेतातील ऊसाला पाणी देत असताना रानडुकराने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

या बाबतीत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारात येथील तात्यासाहेब नगर येथील रहिवासी गणेश देविदासराव कदम ऊर्फ जी.डी.मामा यांची गट नंबर ८४ मध्ये शेतजमीन आहे.शनिवारी दुपारी गणेशराव कदम हे आपल्या शेतात ऊसाला पाणी देण्देयासाठी आपल्या शेतात गेले असता त्या वेळी त्यांच्यावर अचानक आलेल्या रानडुकराने जोरदार हल्ला चढवला. त्यामध्ये शेतकरी गणेशराव देविदासराव कदम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायाचे हाड देखील मोडले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी व नातेवाईकांनी त्यांच्या वर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने रान डुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे.

You cannot copy content of this page