विवाह सोहळ्याठी निघालेली स्वीफ्ट डिझायर कार पेटली; प्रवासी बालंबाल बचावले
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता जवळील घटना; चालक जखमी
हिंगोली (प्रतिनिधी)
विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या एका स्विफ्ट डिझायर कारने रस्त्यावर अचानक पेट घेतलल्याची घटना मंगळवारी २० में रोजी हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे घडली असून,कारमधील एका चिमुकल्याला तहान लागल्याने कारमधील सर्व प्रवासी चहापान करण्यासाठी अपघाती वाहनातून उतरल्याने मोठा अनर्थ टळला असुन सर्व जणं बालंबाल बचावले आहेत.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच २५ आर ५६०३ ही आखाडा बाळापूर येथे भाडे घेऊन जात असताना खानापूर चित्ता येथील हॉटेलवर थांबून कारमधील सर्व प्रवासी चहापाणी घेण्यासाठी हॉटेलमध्ये बसले होते. याचवेळी कारमधून एकदम अचानक फटकन असा आवाज येताच कारने पेट घेतला. बघता बघता कार जळून खाक झाली. राष्ट्रीय महामार्गावर कार पेटल्याची माहिती हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाला मिळताच मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी तात्काळ अग्निशामक दलाचे वाहन रवाना केले. हे वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत कार संपूर्णपणे जळून खाक झाली. यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख अक्षय तांडेल यांच्यासह चालक रवि कांबळे, फायर मॅन बजरंग थिट्टे, आकाश सांगळे यांनी जळालेल्या कारवर पाण्याचा मारा केला. कारने पेट घेतल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले यांनी घटनास्थळी जाऊन सदरील प्रवाशाची विचारपूस केली. कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील विनायक रामकिसन सोळंके यांची ही कार आहे. नेहमी प्रमाणे त्यांना आ. बाळापूर येथील लग्नाचे भाडे होते. त्या लग्नासाठी जात असतांना गाडीतील एका चिमुकल्याला तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी खानापुर फाटा येथे थांबले होते. त्या दरम्यान आपल्या वाहनाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.आगीचा वेग जास्त असल्याने पाहता पाहता पूर्ण कारने सहजच पेट घेतला.