घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळू वाटप योजने शुभारंभ
पूर्णेत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते उद्घाटन
पूर्णा(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी पूर्णा तालुक्यात मोफत वाळू पास वाटपाची सुरुवात करण्यात आली.उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते ममदापूर,कंठेश्वर,वझुर येथील घरकुल योजनेतील १५ लाभार्थ्यांना बुधवारी ता.४ रोजी या उपक्रमाचा लाभ देऊ करत शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार माधवराव बोथिकर, ना.त.प्रशांत थारकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, गटविकास अधिकारी अक्षय सुके, पो.नि.विलास गोबाडे यांच्या सह मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे सुभाष देसाई , नितीन उर्फ बंटी कदम, अँड राजेश भालेराव, प्रमोद काळे, उत्तम ढोणे आदीं पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार पुर्णा तालुक्यात घरकुल धारकांना वाळू उपलब्ध व्हावी यासाठी पूर्णा नदीवरील ममदापूर व गोदावरी नदीपात्रातील सातेगांव, वझुर,कंठेश्वर हे पर्यावरण अनुमती प्राप्त वाळु घाट राखीव ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधीकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशाने पुर्णा तहसील कार्यालयात बुधवारी घरकुल बांधकामासाठी पात्र लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत वाळू पास वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यायोजनेतील कंठेश्वर,वझुर, ममदापूर येथिल १५ लाभार्थ्यांना मोफत वाळू पासचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यातआले.कार्यक्रमाचेप्रस्ताविकात तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी योजनेची भुमिका विषद केली. उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यावेळी बोलताना म्हणाले की,या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या पासवर कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. यामुळे लाभार्थ्यांना वाळू माफियांकडून आकारल्या जाणाऱ्या चढ्या दरापासून मुक्ती मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे घरकुल योजनेच्या कामांना मोठी गती येईल.या योजनेत गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जातीने लक्ष देणार असल्याचे डापकर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे आभार ना.त.प्रशांत थारकर यांनी मानले. घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडसर असलेली वाळू प्रशासनाने सहजपणे उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे लाभार्थ्यांनी स्वागत केले.