स्वा.सै.सुर्यभान पवार महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभाचे आयोजन
पूर्णा ता.१०(प्रतिनिधी)
येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता महाविद्यालयाच्या आयसीटी कक्षात संपन्न होणार आहे.
पूर्णा येथील पवार महाविद्यालयांत आयोजित करण्यात आलेल्या पदवीप्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार,तर कृषिभूषण कांतराव देशमुख तसेच कवी इंद्रजीत भालेराव हे मार्गदर्शन करणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णा येथील तहसीलदार माधवराव बोथीकर,मा. नगराध्यक्ष उत्तमराव कदम,व.ना.मकृषी विद्यापीठातील डॉ.विलास पाटील, स्वा. रा.तीर्थ विद्यापीठाचे डॉ.सुरेखा भोसले, प्रा. डॉ.विजय भोपाळे आदीं मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात कला पदवी, बी. लिब. आणि एम. लिब. या पदवी वर्गाचे प्रमाणपत्र वितरण होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार व परीक्षा विभाग प्रमुख डॉ.संतोष कुर्हे यांनी केले आहे.











