Purna स्वा.सै.सु.पवार महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांना अभिवादन

Spread the love
पूर्णा ता.१(प्रतिनिधी)
येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयांमध्ये संयुक्त महाराष्ट्राचे प्रबोधनकार तथा लोकलेखक साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव तथा प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.तर महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार डॉ. भारत चापके यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page