पूर्णेत गजानन महाराज प्रकट दिन साजरा..
पूर्णा प्रतीनीधी/२१ फेब्रुवारी
पूर्णा : शहरातील नांदेडरोड परिसरातील गजानन महाराज मंदिरात गुरुवारी दि.२० फेब्रुवारी रोजी महाराजांचा प्रगट दिन पारायण, महाआरती, महाप्रसाद कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्णेतील श्री गजानन महाराज मंदिर येथे आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत विजय ग्रंथराज पारायणाचे वाचन करण्यात आले.त्यानंतर अकरा वाजता महाआरती करण्यात आली. सकाळ पासूनच महीला मंडळाच्या वतीने भजनाचेही आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर या क्रार्यक्रमासाठी यजमान राजकूमार लोहीया यांच्या कुटुंबीयांनी महाभिषेक पुजा,आरती केली यानंतर त्यांनी श्रींचे आवडते भाकरी बेसन बुंदी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या भक्तिभावाने मोठ्या उत्साहात भक्तीमयवातावरणात प्रगटदिन साजरा करण्यात आला.यावेळी गजानन महाराज भक्त गणुंनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.या कार्यक्रमासाठी महीलांची विशेष उपस्थिती होती.