परभणी जिल्ह्यात रविवारी श्री गजानन महाराजांची पालखीचे आगमन
त्रिधारा,परभणी, जून रोजी पालखीचे परभणीत आगमन
परभणी,दि.१४(प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र शेगांव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ता.१५ रविवार रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील एरंडेश्वर शिवारातील झिरोफाटा या ठिकाणी आगमन होणार असून सायं ही पालखी श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्कामी असणार आहे.ता.१६ रोज सोमवारी या पालखीचे प्रभावतीनगरीत(परभणी) शहरात सकाळी आगमन होणार आहे.
२ जुन रोजी श्रीक्षेत्र शेगांव येथून श्रींचा पालखी सोहळा पंढरपुरकडे मार्गस्थ झाला आहे.दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी या पालखी सोहळ्यात ७०० वारक-यांसह मोठ्या लवाजम्यासह भाविक सहभागी झाले आहेत.हिंगोली जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सिमेवर पानकनेरगांव येथे १२ जून रोजी या पालखीचे मराठवाड्यात श्री क्षेत्र नरसी (नामदेव) डिग्रस येथून आगमन झाले.पालखी सोहळा श्रीक्षेत्र औंढा नागनाथ, जवळा बाजार, हट्टा (अडगांव रंजोबा) या मार्गाने पालखी सोहळा ता.१५ रोजी पुर्णा तालुक्यातील झिरोफाटा (भारतीकॅम्प) येथे काही क्षण विसाव्यास असणार आहे. पुढे सायं श्री क्षेत्र त्रिधारा,परभणी शहर, ब्राह्मणगांव, दैठणा, खळी, गंगाखेड, येथे मार्गक्रमण करत पुढे बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मार्गे पंढरी कडे प्रयाण करणार आहे.
हट्टा ते त्रिधारा दरम्यान झिरो फाटा,भारतीकॅम्प येथे श्रींच्या स्वागता साठी भाविकांकडून जय्यत तयारी चालविली आहे.रविवारी झिरो फाटा, भारतीकॅम्प येथे भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पुर्णा,एरंडेश्वर, नांदगाव,भारतीकॅम्प परिसरातील भाविकांनी केले आहे.