श्री गजानन माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान;१२ रोजी मराठवाड्यात

Spread the love

शेगांव ते पंढरपूर पायीवारी सोहळ्याचे ५६ वे वर्षे; परभणी जिल्ह्यात १५ रोजी आगमन;सोहळ्याचा ४ दिवस मुक्काम

पूर्णा ता.८(प्रतिनिधी)

पढंरीवारीसाठी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज आपल्या दिमाखदार पायी पालखी सोहळ्यासह शेगांव येथून  २ जुन रोजी मार्गस्थ झाले आहेत. हा पालखी सोहळा मराठवाड्याच्या भुमीत पानकन्हेरगांव येथे १२ जुन रोजी तर १५ जुन रोजी परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा मार्गे श्रीक्षेत्र त्रिधारा येथे पहील्या मुक्कामी असणार आहे.सोहळा जिल्ह्यातील परभणी,गंगाखेडसह ४ दिवस मुक्कामी असणार आहे.यामुळे भक्तगणांनी ठिक ठिकाणी सोहळ्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

      भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडावी आणी वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी यासाठी मागील ५५ वर्षांपासून निरंतर शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने शेगांव-पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केलं जातं आहे.या सोहळ्याचे दिमाखदार सोहळ्याचे हे ५६ वे वर्ष असून, ७०० भाविक व लवाजम्या सह अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने  शेगांव येथील मंदिरातून ही दिंडी मजल दर मजल सुमारे ७५० किमीचा पायी प्रवास करत ५ जिल्ह्यांतून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.शेगांव येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने २ जून रोजी झालं.विदर्भातुन श्रींचा पालखी सोहळा १२ जून रोजी मराठवाड्यातील पानकनेरगांव येथे दाखल होणार असून त्यादिवशी सेनगांवात पालखीचा मुक्काम असणार आहे. १३ जून रोजी पालखी दुपारी श्री संत नरसी नामदेव येथे तर १४ जून रोजी पालखी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथून दर्शन घेऊन जवळा बाजार येथे मुक्काम ठोकणार आहे.जवळा बाजार येथून श्रींची पालखी १५ रोजी सकाळी  बाराशिव हनुमान, आडगांव रंजेबुआ,हट्टा येथून पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.यानंतर पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्रिधारा येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परभणी येथे असणार आहे. यानंतर सोहळा पोखर्णी ,दैठणा मार्गाने गंगाखेड येथे १८ रोजी रात्री  मुक्काम करून पुढे बिड जिल्ह्यातील  परळी वैजनाथ, अंबाजोगाई ,कळंब मार्गे सोलापूर जिल्ह्यातून पंढरीकला ४ जुलै रोजी  पोहचणार आहे.परभणी-हिंगोली  जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पूर्णा तालुक्यात झिरोफाटा येथून पालखी सोहळा  १५ रोजी भारतीकॅम्प येथे काही क्षण विसाव्यास असणार असुन,.. पूर्णा तसेच एरंडेश्वर येथिल भाविकांकडून सेवा केली जाणार आहे.त्याची जय्यत तयारी  सध्या केली जात आहे.

     ‌‌

You cannot copy content of this page