Gangakhedट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत ऊसतोड कामगाराचा मृत्यु

Spread the love

जिल्ह्यातील महातपुरी फाटा-भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.;मयत सोनपेठ तालुक्यातील रहिवासी


परभणी(प्रतिनिधी): गंगाखेड तालुक्यातील महातपुरी फाटा-भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर व दुचाकीचे टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत एका २५ वर्षीय ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
बाळू काशिनाथ राठोड वय २६ वर्ष, रा. पोहंडूळ तांडा ता. सोनपेठ असं त्या ऊसतोड कामगाराचे नांव आहे.तो मंगळवारी आपली दुचाकी घेऊन महातपुरी फाटा येथून उसाच्या फडात जात असताना महातपुरी फाट्यापासून भांबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.घडलेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघात घडताच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पोबारा केला आहे.घटनेप्रकरणी परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताची माहिती गंगाखेड पोलीसांना कळवली.गंगाखेड पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी पहाणी करून स्थानिक लोकांच्या मदतीने बाळू राठोड यास खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटनेप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

You cannot copy content of this page