स्था.गु.शाखेच्या कारवाईत गांजासह दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे कारवाई;आरोपी पसार;गुन्हा दाखल

परभणी/प्रतिनिधी

गंगाखेड शहरालगतच्या डोंगरपिंपळा परिसरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास छापेमारी करत ९४ हजार ७८० रूपयांचा गांजा सह एक दुचाकी असा एकूण १ लाख ४४ हजार ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई दरम्यान आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो फरार झाला.मात्र पोलीसांनी गांजा व दुचाकी ताब्यात घेत एका जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असतांना त्यांना गावातील दत्तराव सिताराम केजगीर याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अधारे पथकाने कारवाई संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी सातच्या सुमारास पथक डोंगरपिंपळा येथे पोहचले. याचवेळी आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने तो गावातून दुचाकीद्वारे फरार होण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता आरोपी दत्तराव केजगीर हा परिसरातील एका पांदण रस्त्यावर दुचाकी व गांजा सोडून फरार झाला. यात पोलीस पथकाने ५० हजारांच्या दुचाकीसह ९४ हजार ७८० रूपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४४ हजार ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे राजू मुत्येपोड यांच्या माहितीवयन गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरनं ३२१/२०२५ मध्ये गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० (बी) (२) आणि २२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास लोखंडे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, सपोनि श्री. राजु मुत्येपोड, श्री.पी.डी. भारती पोलीस अंमलदार परसराम गायकवाड, मधूकर चट्टे, निलेश भुजबळ, कागणे, दिपक मुदीराज, शेख रफीक, लोखंडे यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page