३० वर्षीय विवाहितेवर ४ नराधमांनी केला अत्याचार

Spread the love

पूर्णेतील धनगर टाकळी येथील घटना;त्या चौघांना एका महीलेची साथ;चुडावा पोलीसात ५ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पूर्णा ता.९ (प्रतिनीधी)

एका ३० वर्षीय विवाहितेवर चार जणांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना तालुक्यातील धनगर टाकळी येथे घडल्याचे उघडकीस आले असून, घटनेतील ईसमांना मदत करण्यासाठी एका महीलेचाही सहभाग असल्याची माहिती आहे.याप्रकरणी चुडावा पोलीसांत महीलेसह चार अज्ञात नराधमांविरुद्ध रविवार या.८ रोजी रात्री उशिरा गुरनं १२५/२०२५,कलम ७०,११८(१),१२७(४) भा.न्या.सं कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा तालुक्यातील मौजे धनगर टाकळी राहणाऱ्या एका ३० वर्षीय महीलेची परिसरात एका ग्रामस्थांचे बांधकाम करणाऱ्या अज्ञात मिस्त्री व एका महीलेसह ४ मजुरांसोबत औटघटीकेची ओळख झाली होती.सदरील ओळखीचा फायदा घेऊन यातील ४ जणं तीच्यावर डोळा ठेवून होते.संधी साधत ५ जणांनी संगणमत करून पिडीतेस गोड बोलून तीला नांदेड व त्यानंतर कोणत्यातरी अज्ञात खेडगावातील शेतात नेऊन तिचे हात पाय बांधुन तिच्या संमतीविना तीच्या वर जबरदस्तीने चार अज्ञातांकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. सदरील गोष्ट कुणाला सांगु नये म्हणून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.घाबरलेल्या महीलेने सदरील प्रकार कुटुंबीयांना कळवला.या नंतर कुटुंबीयांनी चुडावा पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलीसांना सांगितला या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात पिडीतेच्या फिर्यादीवरून एका बांधकाम मित्स्री तसेच १ महीला व ३ मंजुर अश्या पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील, ठाणेदार नरसिंग पोमनाळकर यांनी पिडीतेची भेट घेतली आहे.तपास सपोनि नरसिंग पोमनाळकर हे करत आहेत.

You cannot copy content of this page