Gaurai Festival: गौराईच्या पूजेसाठी लागणाऱ्या पुष्पहारासाठी फुलवाल्यांकडून अडवणूक का..?
पुर्णा ता.२(प्रतिनिधी)तीन दिवसांसाठी माहेरी आलेल्या गौराईचे ३१ आँगस्ट रोजी आगमन झाले. रविवार पूजनाचा कार्यक्रम असल्याने पूजेसाठी लागणारी फुले व पुष्पहाराला मोठी मागणी होती. याचा अंदाज घेत विक्रेत्यांनी ग्राहकांची मोठी अडवणुक करून अचानक भावात मोठी वाढ केली. पुष्पहाराची जोडी ६०० ते २ हजार रुपयांपर्यंत गेल्याने अनेक गोरगरिबांना पुष्पहारा विनाच पुजा आटपावी लागली आहे.तर अनेकांनी चढ्या भावाने पुष्पहार खरेदी केली आहे.
गौरीचे आगमन (Gaurai Festival) , मनोभावे पूजन व विसर्जन असा तीनदिवसीय चालणारा गौरी-गणपतीचा सण अनेक कुटुंबीयांना आपुलकीचा वाटतो. माहेरवाशिणींचे लाड करण्याची पद्धत गौरी गणपतीच्या (महालक्ष्मी) रुपाने साजरी केली जाते शनिवारी गौराईचे आगमन झाले. त्यांची विधीवत पूजा करून आवाहन करण्यात आहे. त्यानंतर.गौराईची स्थापना केली. रविवारी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करण्यात आली.
महापूजनात पाना-फुलांची आरास शेवंतीची वेणी, हार याचे महत्त्व असते त्यामुळे बाजारात पुष्पहार व फुलाची मागणी वाढली होती. याचा अंदाज पाहत पुर्णेतील फुलं विक्रेत्यांनी पुष्पहाराच्या किमंतीत एकाएक दहा ते पंधरा पटीने वाढ केली.फुलवाल्यांच्या या आडमुठेपणा मुळे नागरिकांना नाईलाजाने हार फुले विकत घ्यावे लागले(Gaurai Festival) एरव्ही पन्नास ते शंभर रुपयाला मिळणारे पुष्पहार ७०० रुपयापासून २००० रुपयापर्यत विक्रीसाठी ठेवले होते. तर तीस ते चाळीस रूपये किलो प्रमाणे मिळणारे झेंडुची फुले १०० ते २०० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेली. तसेच केळीच्या पानाला देखील मागणी होती. विस रुपयाला पाच या प्रमाणे पाने विकली गेली.एरवी जेमतेम भावाने विक्री होणारे पुजा साहित्य ऐन महालक्ष्मी , गणपती, दिवाळी दस-यात पुजा साहित्याचे दर वाढवून व्यापा-यांनी अडवणु करण्याच्या प्रकाराला कुठं तरी चाप बसला पाहिजे अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेतुन होत आहे.












