पूर्णा तालुक्यातील मुंबर गोदापात्रात पोलिस व महसूल पथकाची मोठी कारवाई ;सुमारे ७ लाखांचे साहित्य केले उद्ध्वस्त

Spread the love

गोदावरी नदीपात्रातील वाळू उपस्याची बोट व मोठा तराफा जळला वाळूही जप्त

पूर्णा /प्रतिनिधी
गोदावरी नदी पात्रात  दिवसाढवळ्या अवैध रित्या विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी एक मोठी बोट व त्यासोबत एक मोठा तराफा सोडून सुरू असलेल्या वाळू उपसा ठिकाणावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील व महसूल प्रशासनाचे प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा,ताडकळस व पालम पोलिस व महसूल पथकाने शनिवारी १८ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास छापा घालून सुमारे ५ लाख रुपये किंमतीची बोट व २ लाख रुपये किंमतीचा तराफा असा ७ सात रुपये किंमतीचे साहीत्य ब्लाॅट करुन उध्वस्त केले आहे.या धडाकेबाज कार्यवाईने वाळू माफियांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.
     पूर्णा तालुक्यातुन वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा नद्यांचे पात्र तुडुंब भरलेले असल्याने अनेक ठिकाणी वाळू उपसा सहजासहजी करता येत नसल्याने वाळू उपसा करण्यासाठी तस्करांनी नाना क्लुप्त्या लढलेल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोटार पाईप नाव असलेली बोट तसेच लाखो रुपये किमतीचे तराफे सोडून तसेच बिन्नी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत. शनिवार दि.१८ जानेवारी रोजी पूर्णा तालुक्यातील नंबर शिवारात गोदावरी नदी पात्रात काही वाळू तस्कर उत्तराफा व बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याची भनक तहसीलदार माधवराव भुतेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांना लागली. डॉक्टर समाधान पाटील व नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पालम पोलीस निरीक्षक थोरात, ताडकळस ठाणेदार गजानन मोरे, तलाठी सिद्धोधन खिल्लारे, नंदकुमार शेलाटे, पोकाॅ. पांडुरंग वाघ यांचे पथक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पथकाने नगरपरिषदेच्या बोटीच्या सहाय्याने नदीपात्रतुन घटनास्थळ गाठून मुंबई शिवारातील गोदापत्रात मधोमध एक भलीमोठी बोट व त्यासोबत एक भला मोठा तरफ याद्वारे वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापा घातला. महसूल व पोलीस पथकाला पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर घटनास्थळावरून प्रसार झाले पोलीस व महसूल पथकाने नदीपात्रातून सुमारे पाच लाख रुपये किमतीची बोट व एक भरा मोठा दोन लाख रुपये किमतीचा तरफ जप्त केला जप्त केलेला मुद्देमाल नदीकाठी आणून जिलीटिंगच्या कांड्याच्या साह्याने हे साहित्य उध्वस्त केले. घटनास्थळावरून सुमारे पाच ते दहा ब्रास वाळूसाठाही पथकाने जप्त केल्याचे समजते.

You cannot copy content of this page