गोदापत्रात ना.त. थारकरांची धडाकेबाज कारवाई
धनगर टाकळी ते पिंपळगाव(लि) दरम्यान कारवाई; इंजिन बोट, तराफे वाळूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पूर्णा( प्रतिनिधी)
येथील महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी ते पिंपळगाव (लि) शिवारातून वाहणाऱ्या गोदापत्रात धडाकेबाज कारवाई करत १ इंजिन सवार बोट, २तराफे,तसेच १० ब्रास वाळू असा सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पूर्णा तालुक्याला वरदाई लाभलेल्या गोदावरी व पूर्णा नदी पात्राला वाळू तस्करांनी अक्षरशः खोकले करून टाकले मिळेल त्या पद्धतीने दिवस रात्र बेसुमार वाळू उपस, अनेक प्रशासनाचे अधिकारी तालुक्यातील विवीध प्रश्न हाताळत या अवैध वाळू चोरीवरही अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. तरी मात्र तालुक्यामध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.
पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा ते धनगर टाकळी दरम्यान गोदावरी नदी पात्रात इंजन लावून सेक्शन पंप आधारे तुडुंब भरलेल्या नदीपात्रातील पाण्यातून मागील काही दिवसांमध्ये वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक महसूल विभागाला मिळाली या माहिती आधारे विभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे आपल्या सोबत पथकास घेऊन कारवाई करण्यासाठी ता.१० एप्रिल गुरुवारी गेले होते. दरम्यान त्यांनी सापळा रचून पिंपळगाव ते धनगर टाकळी दरम्यान गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या इंजिन बोट शिक्षण पंप सह तराफे या प्रकार दिसून आला. ते पथकासह नदीपात्रात यावेळी वाळू उपसा करणारे वाळू माफिया नदीपात्र जोड्या टाकून पालम तालुक्याच्या साईडने पळून गेले. सर्व मुद्देमाल जप्त केला यामध्ये ३ लाख रुपये किमतीचे इंजिन असलेली बोट,५० हजार रुपये किमतीचे तराफे, तसेच वाळू माफी आणि उपसलेली नदीकाठची पन्नास हजार रुपये किंमतीची १० ब्रास वाळू घटनास्थळावरून जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली इंजिन सेक्शन पंप, बोट, असा एकूण ४ लाख रुपयांच मुद्देमाल जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असल्याचे समजते.जप्त करण्यात आलेली वाळू घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे तहसीलदार बोथिकर यांनी यावेळी सांगितले. .